Be a Rebel
Tuesday, August 13, 2024
भगत सिंह
ये भगत सिंग तू जिंदा है
हर एक लहू के कतरे मै...
हर एक लहू के कतरे मै...
इन्कलाब के नारे मै...
माझा साडेतीन वर्षांचा कबीर मला म्हणाला झेंडा वंदनला मी भगत सिंह बनून जाणार, I Love Bhagat Singh तेव्हा मला वरील ओळी आठवल्या.
"Merciless criticism and independent thinking are two traits of revolutionary thinking. "
केवळ तेवीस वर्षाच्या आयुष्यात क्रांती, लोकशाही, समाजवादाबाबत अनेक विचार मांडणाऱ्या भगत सिंह पुढील असंख्य पिढ्या जिवंत असतील ह्याबाबत आता माझ्या मनात शंका नाही.
हम बदलते है तो निज़ाम बदल जाते है
सारे मंजर सारे अंजाम बदल जाते है
कौन कहता है भगत सिंह फिर नही पैदा होते?
पैदा तो होते है बस नाम बदल जाते है 🇮🇳
Sunday, July 12, 2015
वेश्या
वेश्या स्वतःहून कोणी बनत नसते वेश्या बनवल्या जातात. बाजार सिनेमात स्मिता पाटील म्हणते " इंसानो के बाजारोंमे सबसे सस्ती चीज है औरत..." वेश्यांना ह्या देशात मनाचे स्थान नाही कारण त्या शरीर विकतात पण विकत घेणारे तर आपण असतो ना, आपण विकत घेतो म्हणून त्या विकतात.
"हमारे रातो का तुम वो राज हो जो सुबह कोई नही खोलना चाहता" - The Dirty Picture...
वेश्या व्यवसाय गरज आहे समाजाची ती चालत आलेली प्रथा आहे हे सर्व मान्य आहे पण नैसर्गिक मानवी हक्कांपासून आपण त्यांना दूर कसे ठेवू शकतो. समाजात त्यांना ही मानाचे स्थान मिळावे. एखादा हिरो वेश्येसोबत लग्न करतो आणि आपल्याला ही सिनेमात ते आवडते पण खऱ्या जीवनात काय? आपण विचार नाही करू शकत अशा लग्नाचा.
वेश्येच्या मुलीला कसे पाहिले जाते ? वेश्या म्हणूनच...तिचा काय दोष? ... जन्मताना आई वडील नाही निवडता येत. पुढे ना जग तिला स्वीकारते ना समाज. धिक्कार असो अश्या समाजाचा जिथे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला जात नाही. वेश्येकडे जाणाऱ्या लोकांना आपण वाळीत टाकतो का? ती जर दोषी असेल तर तिथे जाणारा हा दोषी नाही का? अरे कोणत्या समाजात राहतो आपण?
"वो पुरपेच गलीया वो बदनाम बाजार
वो गुमनाम राही वो सिक्को कि छंकार
जिन्हे नाज है हिंद पर वो कहा है..."--प्यासा
वेश्ये कडे जाणारे एका विशिष्ट वयाचे आहेत असे नाही. "यहा पीर भी आ चुके है जवां भी , तनोमंद बेटे भी अब्बा मियां भी ..." तिथे येणारे तरुण मुले आहेत तर त्यांच्या वडिलांच्या वयाची लोक पण आहेत. मी म्हणत नाही की हे सर्व बंद व्हावे पण यावर बंधने हवी काही रेगुलेशन हवे. आणि वेश्यांना समाजात स्थान मिळावे. त्यांच्या समस्या सोडवल्या जाव्यात.
शेवटी ह्या कोण आहेत? " ये बिवी भी है और बेहन भी है मां भी "
"मदद चाहती है ये हव्वा कि बेटी
यशोदा कि हम्जीन उस राधा कि बेटी
पय्यमल कि उन्मत जुलैखां कि बेटी
जरा मुल्क के रेह्बरो को बुलावो
ये पुचे ये गलीया ये मंजर दिखावो
जिन्हे नाज है हिंद पार उनको लावो" -- साहीर लुधियानवी

Subscribe to:
Comments (Atom)